छत्रपती संभाजीनगर, मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा (सांजवार्ता ब्युरो): जागतिक वारसा दिनानिमित्त शनिवारी शिवगान कार्यक्रमाने दिल्लीगेट परिसर ताल अन् सुरांनी दुमदुमून गेला. शिवरायांचा पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा यांना सुरांची जोड मिळाल्याने उपस्थित नागरिक भारावले. शिवरायांनी आग्रा भेटीसाठी रवाना होताना याच दिल्ली गेट मार्गाची निवड केली होती. कार्यक्रमातून त्यालाही उजाळा देण्यात आला. कार्यक्रम घेतला. इनामदार लिखित रसाळ शिवगीते आणि शांतिभूषण देशपांडे यांच्या संगीत संयोजनातून सादर झालेले शिवगान एक जिवंत ऐतिहासिक अनुभव ठरला. वैभव पांडे, वर्षा जोशी यांच्या गायनाने शिवचरित्रातील विविध पैलू जिवंत झाले. सहगायक सर्वज्ञ उस्मानपूरकर, कल्याणी देशपांडे, शांतिभूषण देशपांडे (संवादिनी), गजानन धुमाळ (तबला), गिरीश काळे (बासरी), गोपाळ खोमणे (पखवाज) यांनी साथसंगत केली. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले.
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, साहित्य संगीत कला
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












